गावाचा इतिहास
या गावाचं नाव 'महादेवाचे केरवडे' या नावाचा मोठा इतिहास आहे. शेकडो वर्षापुर्वी या गावामध्ये महादेवबाबा नावचे सिद्ध पुरूष होऊन गेले. त्यांच्याच नावावरुन गावाला महादेवाचे केरवडे या नावाने ओळखले जाते. त्यांनी आपल्या तप:श्रर्येतून सिध्दी प्राप्त केली. व त्याद्वारे लोकांची सेवा केली. यामुळे ते ' श्री सिद्ध महादेव' या नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यांचे मंदिर गावाची शान आहे. शेकडो भाविक महादेवबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. मे व श्रावण महिन्यातील सोमवारी या मंदिरात जत्रा असते. गावातील दूसरे मंदिर हे ग्रामदेवता माता पावणाईचे आहे.


ग्रामपंचायतीबद्दल व इतर माहिती

